कधी येशील म्हणून ......

Started by Prasad.Patil01, March 21, 2014, 11:24:01 AM

Previous topic - Next topic

Prasad.Patil01

तुझी जीवाला या ओढ ,
तुझ्या आठवणी गोड ,
सखे अबोल हा सोड ,
आता बोल ना जरा....!

तुझी साथ हवी मला ,
प्रेम बात हवी मला ,
एक हाक दे ना मला ,
तुझ्या प्रीतीची....!

नको अशी छळू मना ,
क्षण येईल ना पुन्हा ,
तुझ्या वाचून हा जिना ,
झाल दुषवार  गं.....!

आता नको लांब जाऊ ,
नको आता वेळ लावू ,
जरा मन दे ना न्हाऊ ,
प्रेम पावसात गं......!

जिथे भेटायचो आधी ,
तीच वाट,घाट,माती ,
सारी तोडून हि नाती ,
का गेलीस तू .....?

राधे त्याच नदीकाठी ,
हा कान्हा अजूनही ,
वाट पाहतो ग तुझी ,
कधी येशील म्हणून ......!!!!
                       
                    प्रसाद पाटील