कळत कसं नाही ग तुला ??

Started by Prasad.Patil01, March 22, 2014, 09:30:06 PM

Previous topic - Next topic

Prasad.Patil01

कळत कसं नाही ग तुला,
मला हे कळत नाही,
वाटत कळत असूनही,
तुला का ते वळत नाही !!

मी वेडा प्रेमात तुझ्या बघ,
विसरलो या दिशा दाही,
हरदिन माझा शोधत तुझ्या अन,
विचारात हि रात जाई !!

होताहेत भास तुझे ग,
दिसतेय मज तू ठायीठायी,
खरच तुझ्या सवे ग सखे,
घडतंय का असंच काही ??

का करतो मी प्रेम हे इतकं,
प्रश्न पडतो काही मलाही,
मग मन हे माझं उत्तर देत,
तू नाही तर काहीच नाही !!

आहे मी बेहाल राणी,
सांग ना तू उत्तर काही,
तुझ आपलं तेच असत,
कधी हो कधी नाही...
कधी हो !!! कधी नाही !!!
                       
                             - प्रसाद पाटील