तुझी नि माझी पहिली भेट...

Started by Lyrics Swapnil Chatge, March 23, 2014, 01:43:52 PM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

तुझ्या माझ्या भेटीचे क्षण,
अजून आठवतं खुप मला...
हरवलो होतो भान सारे,
पाहताच समोर मी तुला...

अंगावरती नेसलेली नववारी,
खुप उठून शोभत होती तुला...
वाटत होते हद्यास माझ्या,
कवटाळून ठेवु या क्षणाला....

गजरा माळलेल्या केसात,
दरवळत होता सुगंध फुलाचा...
अन् हळूच जाणत होतो,
गंध तुझ्या माझ्या प्रितीचा...

हसताना गालावरच्या खळीत,
नकळत मन माझं फार गुतंलं...
अन् तुझ्या या रुपाचा मोहात,
खोल-खोल डोहात संबंध बुडालं....!!

------------- ---------------
स्वयंलिखीत:-
©स्वप्नील चटगे.
(23-मार्च-2014)