ययाति - वि. स. खांडेकर

Started by marathi, January 24, 2009, 12:45:38 PM

Previous topic - Next topic

marathi

fantastic kadambari..

भारतीय ज्ञानपीठाचा "वाग्देवी" पुरस्कार १९७४ साली मिळालेली खांडेकराची अतिउत्कृष्ट कादंबरी.
साहित्य अकादमी पुरस्कार १९६०
महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९६०
कै. विष्णु सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील 'ययाति'चे स्थान मेरुमण्यासारखे आहे.
या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही. एका प्रसिद्ध पौराणिक उपाख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरीत स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत. आपल्या प्रतिभेची जात, तिची शक्ती आणि तिच्या मर्यादा यांची योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्माविष्काराला योग्य अशीच कथा निवडली. ती ज्या माध्यमातून त्यांना प्रगट व्हावीशी वाटली, त्याच्यावर त्यांचे प्रभुत्व होतेच. पुराणकथांत जे भव्य-भीषण संघर्ष आढळतात, त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती. जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगुर आहे, तसेच ते दुसर्‍या दृष्टीने चिरंतन आहे; ते जितके भौतिक आहे, तितकेच आत्मिक आहे, या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते. त्यामुळेच एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठच 'ययाति'च्या रूपाने श्री. खांडेकरांनी वाचकांपुढे ठेवला आहे.
कामुक, लंपट, सप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत.
'ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी,' अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.

chetant087


कथेचे वस्तु काही असो तरी, त्या कथेला मराठीत आणतांना त्या कथेला - मानुषीय भावनांचा, मानुषीय गुणांचा स्पर्श देऊन त्या पात्रांना निज जीवनात सृष्टी करण्याचं सामर्थ्य हे मराठी भाषेच्या कवी, लेखकांचा एक वैशिष्ठ्य होय. या गोष्टीत मराठी भाषेस सरिसमान होउन स्पर्धा करणारी कोणतीही इतर भाषा नाही यात वाद नाही.

"ययाति" ही अशीच एक कादंबरी.

पौराणिक कथे- तल्या पात्रांना त्यांचा पौराणिक रूपाला च्युती न आणता, त्या पात्रांना मानुष गुणांचा स्पर्श देउन कादंबरीत लेख कांनी त्यांना सामान्य मानुष जीवनात पुनःसृष्टि केला आहे.  त्या पात्रांचा अंतरंगात शिरून त्यांचा अंतर्मनातलं- भावनात्मक, नैतिक, व अध्यात्मिक संघर्षांना खूपच सुंदर रीतीने चित्रविला आहे.

शर्मिळेचं- जे जीवनात आला ते स्वीकार करून पुढे चालायचा मनोधर्म ( मनोधैर्य जास्त उचित शब्द म्हणता येइल !), उदारता, त्याग हे निज जीवनातल्या स्त्रींचा चित्रण समोर अणून देतात.

तसेच- देवयानीचा समय साधकता (संधी साधणं), इर्षा मनोभाव व जिंकूनही हारत असताना होणारी असहायकतेची भावना, ययातिचे विषय लंपटता हे मनुष्य जीवनातले विविध चित्रणं देउन जातात.

शुरुवातीला पूर्ण भौतिक वाटली नंतरच्या चित्रणांत पात्रांना- एक उत्कृष्ट जीवन प्रेम व एक उत्कृष्ट नैतिक जवाबदारीची जाणीव असल्याचं दिसून येते. आणि जशी-जशी कादंबरी पुढे जाते तसे-तसे त्यातले पात्र आम्हालाही ते मौल्य शिकवून जातात. जीवनाला एक नवीन दृष्टिकोनातून पाहण्यासाठी उत्स्फूर्त करतात.

खरच ही मराठीतली एक अनमोल कृती.



   




chetant087

आणि most importantly  ज्यांना जगणं खूप कठीण व नीरस वाठतंय (काहीही कारणांनी :D ) - ते तर नक्कीच वाचा. कादंबरी संपताच बरच काही शिकाल व जीवना कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.... :)

Çhèx Thakare

#3
"शर्मिष्ठा"
अतिशय सुंदर राजकन्या ययाती वर जिवाडपाड प्रेम करणारी, एक स्ञी मन किती विशाल असते ते दाखवून देणारी
राजकण्या असूनही एका दासीचे जिवन शांत मनाने स्विकारणारी शर्मिष्ठा खूप सुंदर ..

"देवयानी"
हट्टी, तापट, कठोर, अहंकारी पण कचावर  मनापासून प्रेम करणारी अन ययाती सोबत संसार करणारी  देवयाणी, अतिशय सुंदर रित्या स्ञी रूपाचे वर्णन केलेतं.

"कच"
विचारी, संयमी,  ध्येयवादी,  तरूण कच , खूप सूक्ष्मतेने स्वभावचिञण केलेत त्याचे, दुर्दैवाने त्याला त्याचे प्रेम सफल होऊ शकले नाही, पण निरपेक्ष प्रेम कसे असावे हे माञ त्याचाकडून नक्कीच शिकावे.

अर्थातच "ययाती" केवळ एक पौराणिक कथा नाही तर मर्यादा,जाणिव,चिंतन,संघर्ष,सत्याचे अकलन अतिशय स्वतंञरित्या खांडेकरांनी गुंफले आहे ..
"अप्रतिम कादंबरी *****"
सलाम खांडेकरांना  ...  _/\_

- चेतन