कटाक्ष

Started by SANJAY M NIKUMBH, March 27, 2014, 10:23:19 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

कटाक्ष
==============
पहिल्यांदाच असे घडले
भेटूनही न पाहिले
न पाहताच तुझे
पाऊल कसे वळले

तरी तुझ्या मनातही
असेलच पानं सळसळले
जरी निघून गेलीस तू
माझ्यासाठी असेल मन कळवळले

टाकला असतास कटाक्ष
काय असते बिघडले
हेच क्षण तुझ्या माझ्या
हृदयात आता रुतले
====================
संजय एम निकुंभ , वसई
दि. २७.३.१४ वेळ : ६.४५ स.