|!| तुझाच प्रेमवेडा |!|

Started by Lyrics Swapnil Chatge, March 29, 2014, 07:03:49 AM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

|!|   तुझाच प्रेमवेडा   |!|

तुझ्या येण्याची वाट बघतं,
शीतल चंद्राला पाहत बसत...
अन् चंद्राला पाहताना मला,
पून्हा तुझा हसरा चेहरा दिसतं...

आकाशातील हळवे धुदं वारे,
स्पर्शुनी पुन्हा मला जात रे...
जणु पहिल्या भेटीत तूझ्या,
माझं हरवलेले वेडं भान रे...

सागरी समुद्राच्य निळसर लाटा,
बोलत होते माझ्याशी एकटेपणात...
अन् सागंत मला प्रत्येक क्षणी,
तु येशील पुन्हा माझ्या जीवनात....

नसतं का भान माझ्या मला,
भिजवत स्वःताला पावसात...
अन् ओल्या तुझ्या आठवणी,
साठलं माझ्या वेड्या मनात...

तुझ्या येण्याची वाट बघत..!!

--------------- --------------
स्वयं लिखीत:-
©स्वप्नील चटगे.
(29-मार्च-2014)