तुझ्या बरोबर...

Started by शिवाजी सांगळे, March 29, 2014, 12:53:40 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

धग उन्हाळी, भरल्या दुपारी
सावली शोधणे, तुझ्या बरोबर,
बर्फ गोळा, चोखून पंचरंगी
स्वप्ने पाहण, तुझ्या बरोबर !

थांबा उभा, गोठलेल्या पायांनी
प्रतीक्षा बसची, तुझ्या बरोबर,
बिलगून भिजणे, पुन्हा बिलगणे
एकाच छत्रीत, तुझ्या बरोबर !

हिवाळ्यात थंड, चादर धुक्याची
पहाटची रपेट, तुझ्या बरोबर,
चहा वाफाळलेला, दव थेंबाचा
उब ओठांना, तुझ्या बरोबर !

धुराच्या वलया, सोबत उठलेले
शब्द वादळ, तुझ्या बरोबर,
क्षण क्षण, आठवतात केलेले
व्यतीत सारे, तुझ्या बरोबर !



©शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९