अनोखे प्रेम...!

Started by श्री. प्रकाश साळवी, April 01, 2014, 01:04:48 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी



तीच वेळ, तीच संध्याकाळ,
रोजच्या सारखी,
आणि तू..!
तीच आसुसलेली नजर,
तेच अवती भवति पाहणे,
एखाद्या परीचीतासारख,
हे रोजचेच आहे,
मी तुला पाहतो....रोजचीच तू,
आकर्षक पेहेराव, डोळ्याला चष्मा,
आणि त्यातून तुझ निरखून पहाणे,
आपली नजरा नजर,
आणि एकमेकांकडे पहाणे,
अगदी ओळख असल्यासारखे
पण आपली ओळख ना पाळख,
तरीही तू हवी हवीशी वाटते,
पण बोलायचे धाडसच होत नाहीये,
एखाद्या बावरलेल्या हरीणा सारख
अनोख प्रेम अनाहूत आलेल्या गवतासारख

श्री प्रकाश साळवी दि. ०१ एप्रिल २०१४


roshan gurav