कोणी तरी

Started by Nitesh Hodabe, September 17, 2009, 09:24:05 PM

Previous topic - Next topic

Nitesh Hodabe

===================================================================================================

कोणी तरी लागतं
आपल्याला वेडू म्हणणारं
वेडू म्हणताना आपल्यातलं
शहाणपण जाणणारं.

एकदा मला ना
तू माझी वाट पहाताना पहायचंय
तेवढ्यासाठी आडोशाला
हळूच लपून रहायचंय.

माझ्या वहीचं एक पान
कोरच राहून गेलं
आता वही जुनी झाली पण
त्यावर लिहायचच राहून गेलं.

विसरलेलं सगळं
पुन्हा आठवतं
सगळं विसरलोय
हे आठवलं की.

असे बेसावध क्षणच
सावधपणे टाळायचे असतात
जवळ येताना दुराव्याचे
काही नियम पाळायचे असतात.

पुसणारं कोणी असेल तर
डोळे भरुन यायला अर्थ आहे
कुणाचे डोळे भरणार नसतील तर
मरण सुद्धा व्यर्थ आहे.

मी आहेच जरा असा
एकटा एकटा राहाणारा
वाळकं पान सुद्धा गळताना
तन्मयतेने पहाणारा.

पिंपळाचं रोप कसं
कुठेही उगवतं
कुठेही उगवतं म्हणून
त्याचं कसही निभावतं.

वाळकं पान गळताना सांगतं
वसंत आता येणार आहे
वसंत ओरडतच येतो
की मी लगेच जाणार आहे.

मरताना वाटलं
आयुष्य नुसतच वाहून गेलं
मला जगायचंय, मला जगायचंय म्हणताना
माझं जगायचंच राहून गेलं.

===================================================================================================
===================================================================================================