|!| पून्हा तिला आठविता... |!|

Started by Lyrics Swapnil Chatge, April 04, 2014, 02:03:09 PM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

आज ती मला पुन्‍हा भेटली,
त्‍याच जुन्‍या वळणावर...
अन् डोळे माझे भरुन आले,
अचानक तिला समोर पाहिल्‍यावर...

ती ही मला  पाहत होती,
अन् मीही तिला पाहत होतो...
अन् मनातील अबोल भावना,
का एकमेकांस बोलत नव्‍हतो...

ती माझ्या जवळून गेली,
मला काही न बोलता...
अन् तू का वळून पाहिलीस,
मी माझी मान वळवता...

पुन्‍हा एकटा पडलो मी,
आयुष्‍याच्‍या वाटेवरती चालता...
अन् का भुतकाळात जातो,
पुन्‍हा मी तुला आठविता....

--------------------------------
स्वयं लिखीत:-
—★ *´¨)
¸.•´¸.•*´¨) ¸.•*¨)
(¸.•´ (¸.•` » स्वप्नील चटगे«★