हनी तू मला हवी आहेस...

Started by Ankush S. Navghare, Palghar, April 04, 2014, 11:44:30 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

हनी तू मला हवी आहेस...
माझ्या सुखात माझ्या दुखात
तू मला हवी आहेस
मी एकाकी असताना
खोट खोट हसताना
तू मला हवी आहेस
माझे अश्रु पुसायला
मला सावरायला
हनी तू मला हवी आहेस
भरुन आल तर जवळ घ्यायला
जखमेवर फुंकर घालायला
तू मला हवी आहेस
मला आधार द्यायला
माझा आधार बनायला
तू मला हवी आहेस
संकटात साथ द्यायला
माझी ढाल बनायला
हनी तू मला हवी आहेस
मला समजुन घ्यायला
मला समजवायला
तू मला हवी आहेस
खांद्यावर डोके ठेवायला
केसातून हात फिरवायला
तू मला हवी आहेस
मला घास भारवायला
मला आईची माया द्यायला
हनी तू मला हवी आहेस
माझ्यावर खुप प्रेम करायला...
माझ्यावर खुप प्रेम करायला...

...अंकुश नवघरे©
04/04/2014