सारं कळत नकळतच घडते..!!

Started by कुलदीप माकडे, April 05, 2014, 09:29:00 PM

Previous topic - Next topic

कुलदीप माकडे

तुला पाहिल ज्या दिवसा पासुन
मन माझं उगीचं धडकते
बेधुंद झालो मी असा की
सारं कळत नकळतच घडते..

तुझ्या डोळ्यांमध्ये मी असा हरवलो
बाकींच काय मी स्वतःलाच विसरलो
जेव्हा तु डोळ्यांना मला बघुन उघडते
बेधुंद होतं मन माझं आणि
सारं कळत नकळतच घडते..

खुप वाटतं या नाजुक मनाला माझ्या
बघतच राहावं डोळ्यांमध्ये तुझ्या
जेव्हा तुझी नजर माझ्या नजरेवर पडते
बेधुंद होतं मन माझं आणि
सारं कळत नकळतच घडते..

तुझ्या त्या रेश्मी लांब केसात
स्वतःला  हरवून बसलो मी ह्यात
जेव्हा हे केस तुझ्या कानावर पडते
आणि हळूच तू जेव्हा त्यांना कानामागे वळवते
बेधुंद होतं मन माझं आणि
सारं कळत नकळतच घडते..

काय म्हणू मी तुझ्या त्या नाजुक ओठांना
चैन पडेना मला झोपतांना
जेव्हा माझं नाव तुझ्या ओठांवर पडते
बेधुंद होतं मन माझं आणि
सारं कळत नकळतच घडते..

असं वाटतं आग लावून टाकावं या जगाला
जेव्हा कोणी दुखावलं तुझ्या मनाला
राग माझा ज्वाला बनून डोक्यात भडकते
जेव्हा या सुंदर डोळ्यातून अश्रू बाहेर पडते
बघून हसतांना तुला मन माझं गगनाला भिडते 
बेधुंद होतं मन माझं आणि
सारं कळत नकळतच घडते..

काय तुझं थाट आणि काय ती तुझी अदा
हरवून बसलो स्वतःला आणि झालो तुझ्यावर फिदा
घडवलं तुला देवाने मोठ्या फ़ुर्सतिने
आभारी आहो मी भेटलीस तू मला नशिबाने
जेव्हा तू मला प्रेमाने अल्गद येउन बिलगते
बेधुंद होतं मन माझं आणि
सारं कळत नकळतच घडते..
सारं कळत नकळतच घडते..   

Trupti L