अस्थित्व माझे कुठे दिसेना...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., April 06, 2014, 09:59:34 AM

Previous topic - Next topic
अस्थित्व माझे कुठे दिसेना...!!

देवा तुझं हे वागणं,
अगदी बरं आहे,
तु जे करतोस ते,
अगदी खरं आहे.....

चांगल्या सोबत नेहमी,
जानून बूजून वाईट वागतोस,
पाप्यांना पापात साथ देऊन,
त्यांचा सोबत चांगला राहतोस.....

का कसे आणि,
कशाला मी मानू,
खरचं तू देव आहे.....

दगडाच्या काळजाचा तू,
तुला समजत नाही भावना,
दुष्टांचा उध्दार करण्यात,
मिळते तुला प्रेरणा.....

किती रे कठोर होशील तू,
किती देशील ह्रदयाला वेदना,
काहीच कसे वाटत नाही रे तुला,
चांगल वागूनही मन सोसतयं यातना.....

माझ्या जिवाची आग,
तुझ्या उरात पेटू दे कधी,
अक्षरशा थकलोय मी,
करुन तुझी साधना.....

झाडा वरच्या पानांगत,
गळलोय मी चोहीकडे,
स्वतःला जाणवतच नाही मी,
अस्थित्व माझे कुठे दिसेना.....

अस्थित्व माझे कुठे दिसेना.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक ०६/०४/२०१४...
सकाळी ०९:५१...
©सुरेश सोनावणे.....