क्रुसावर चढतांना

Started by SANJAY M NIKUMBH, April 06, 2014, 02:43:30 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

क्रुसावर चढतांना
============
इतकाच केला गुन्हा
प्रेम केलं तुझ्यावर
प्रेमासकट तू मला
चढवून दिलं क्रूसावर

गारुड तरी कां केलं
तू माझ्या मनावर
नावं तरी कां लिहिलं
माझं तुझ्या काळजावर

तरी म्हटलं होत तुला
प्रेम करू नकोस माझ्यावर
कां बदललीस वाट तुझी
इतकं मला गुंतवल्यावर 

वाटलं होतं तुला विसरेन
मी क्रुसावर चढतांना
पण तुझच राज्य असतं
प्रिये माझ्या आत्म्यावर
=============
संजय एम निकुंभ , वसई
दि. ६.४.१४  वेळ : २.२० दु.