मी कुठे दिसते का रे?............

Started by kavita.sudar15, April 06, 2014, 02:48:58 PM

Previous topic - Next topic

kavita.sudar15

मनाचेच आहेत हे खेळ सारे,
क्षणात जाणिले मी, तुला इतका वेळ का रे?

प्रेमाचे विनलेस तूच जाळे,
तरी तू प्रत्येक गोष्टीना परकाच का रे?

डोळे मिटताच दिसते आपणांस स्वप्नांची दुनिया,
स्वप्न हि बघत नाहीस, खरच तू झोपतोस ना रे?

आकडे आपले सारखेच गणित जुळले प्रेमाचे,
तरीही तुला भावनांचे जग निराळेच का रे?

झोंबतो हा विरह, तुला ते शब्दातूनही न कळावे,
एकच आहे मार्ग आपला, तरी तुझे पावूल का वळावे?

जुळले सूर कधीच प्रीतीचे,
तरी तुला हे गीत का न जमावे?

निशब्द तू, निशब्द प्रेम, निशब्द सारे,
डोळे अबोल शब्दातून कधीतरी सांग ना रे?

अखेरचा एक प्रश्न विचारू का तुला?
पाहतोस जेव्हा हे जग डोळ्याने, मी कुठे दिसते का रे?.........!!!! @कविता@

vidyakalp

खरच निशब्द करणारी कविता आहे......सुंदर