आज काय उद्या काय

Started by atulmbhosale, April 06, 2014, 05:38:07 PM

Previous topic - Next topic

atulmbhosale

आज काय उद्या काय
आज काय उद्या काय
मत घेऊन निघतील पाय
पुन्हा परतून येतील काय?

आश्वासने झाली वांझ
सूर्य उगवून झाली सांज
त्यांच्या घरी प्रकाशलाट
अंधारा वाट देईल काय?

चार आले चार गेले
घोषणाबाजी ओकून गेले
छातीवरती जोडले हात 
खरे आत असेल काय?

झेंडा आम्ही धरतो रे
विजयासाठी मरतो रे
स्वार्थासाठी युती रीत
खरे हित साधेल काय?

कैक येतील कैक जातील
दिवस असेच निघून जातील
माणसाहारी अवघी जात
एकसाथ मरेल काय?

गरिबाने गरीब व्हावे
धनिकाने धनिक व्हावे
आम्हावाचून उलटी रीत
सुलटी कोण करेल काय?

खूप झाले घेतले धडे
फोडून टाकू सडके घडे
जनाताबळ लपवून आज
लोकराज येईल  काय?

नाहीतर मग याशिवाय
आज काय उद्या काय?
मत घेऊन निघतील पाय
पुन्हा परतून येतील काय?
अतुल भोसले
कोल्हापूर
8888862737