ये माझ्या मिठीत

Started by Tejas khachane, April 07, 2014, 06:18:31 PM

Previous topic - Next topic

Tejas khachane

ये माझ्या मिठीत आपण मरुन जाउ ठार,
भुतकाळ, वय, संसार जुन्या खंती अपरंपार....
नकोत गिल्टड्रीप्स स्मृतिंच्या रानात
जळुन गेल्यावर जी सगळी होते राख,
तितकं हलकं व्हायचयं या प्रेमात.
संवादातुन काढुन टाकू बाजुला
हेतुंचे काटे स्किलफुली
नाही तर जानेमन,
कशाला प्रेमाच्या नावाखाली
प्रेतांच्या जिवंत बोलाचाली.......

Tejas khachane