आई माझी सावली प़्रेमाची....

Started by Shivshankar patil, April 10, 2014, 02:35:31 PM

Previous topic - Next topic

Shivshankar patil

     आई माझी सावली प़्रेमाची....

आई तु माझी सावली प़्रेमाची
होरपळला तुझा देह
आम्हा जगवण्यासाठी...
त्याग तुझा काय वर्णावा
आम्हा घडवण्यासाठी.
फाटके ईरकल लुगडे नेसुनी
चांदणी उगवताच, थकल्या देहाने,
अंथरुन सोडुन,
ओल्या लाकडाची चुल पेटवत होतीस तु,
पुन्हा पुन्हा फुंकुण.
कोंड्याचा मांडाकरुनी,भोजन तुझे गोड.
अडचनीवर मात करी तु
ठेवूनी मंगळसुत्र गहान.
आठ लेकरांची माता,तु किती थोर
कौतुक ऐकता पाडसाचे,
उर येते तुझे भरुन.
बाळ तुझा झाला आता मोठा,
संपत्तीचा नाही आता तोटा...
सोन्याचा घास खाण्यास,
का राहीली नाहीस आता...
तुझ्या विन वैभव माझे कवडी मोल..
नाही बनु शकलो मी श्रावण बाळ
असा कसाग माझा
मानव देह.....

शिवशंकर बी.पाटील
९४२१०५५६६७

Namrata5554

छान कविता आहे ,मनाला हुरहुर लावते.

sbpimple