प्रिया

Started by विक्रांत, April 18, 2014, 11:30:12 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

ताम्र करडे
तुझे डोळे
सूर्य किरण
जणू सांडले
आणि तरीही
मवाळ ओले
जणू आताच
व्याकूळ झाले
आणि भुरकट
तसेच पिंगट
केस कपाळी
होते लहरत
रेखीव तरीही
उदास हसणे
दु:ख थिजले
काही दिसणे
स्वर्गीची तू का
असे अप्सरा
प्रिया हरवली
दूर सागरा
त्या विरहाचे
दु:ख शापित
वदती अधर
काही नकळत

विक्रांत प्रभाकर