एक जूनी मैत्रीण...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., April 23, 2014, 07:20:22 PM

Previous topic - Next topic
एक जूनी मैत्रीण...!!

आज ब-याच दिवसानंतर एक जूनी मैत्रीण भेटली,
" कसा आहेस रे पागल,
म्हणुन विचारपूस करु लागली,
पुढे असे काही प्रश्न उत्तरे झाली,
की आपोआप डोळ्यातून अश्रूं वाहीली.....

तिने विचारले :
" सुरेश तू ज्या कविता लिहतो,
त्यात तिचाच उल्लेख का असतो ?
तू नेहमी असा गप्प गप्प का राहतो ?
तू नेहमी कोणत्या विचारात असतो ?
तू बोलताना दुःखी असल्यागत का वाटतो ?
स्वतःला नेहमी एकटा का समजतोस ?
तिच्याच स्वप्नात रमलेला दिसतो ?
असं काय आहे तिच्यात जे दुस-या मुलीँमध्ये नाही ?
तू तिला का विसरु शकत नाही.....???

तिचे हे बोलणे ऐकून,
मी थोड्या वेळ अबोल झालो
तोँडातून शब्दच फुटत नव्हते,
मग नंतर कसा बसा स्वतःला सावरत तिला एवढेच बोललो,
" अगं वेडाबाई...
" माझं तिच्यावर मनापासून,
खुप प्रेम आहे...
जर वासना असती,
तर तिला केव्हाच विसरलो असतो.....

माझं हे बोलणं ऐकून, तिचे ही डोळे भरुन आले,
अश्रूं पुसत स्वतःला सावरत,
देव करो तुझं प्रेम तुला परत मिळो,
म्हणुन घरी जायला निघाली.....
♥  :'(  ♥ :'(  ♥

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक २३/०४/२०१४...
सांयकाळी ०६:५८...
©सुरेश सोनावणे.....