द्वंद्व ..

Started by विक्रांत, May 04, 2014, 09:19:44 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

तू कविता झाली आहे
माझ्या मनी रुजली आहे
युगायुगांचे अंतर तरीही
मनी चंद्रिका भिनली आहे...

अरे बापरे काय करे मी
कोण तू अन कुठली आहे
कर लगबग चल निघ इथुनी
गाडी ही तर सुटली आहे

विरघळवणारा सहवास तुझा
मनात फुले सजली आहे
जावू नये तू दूर कधीही
मनी अभिलाषा जागली आहे

हो जागा का उभाच निजला
वर्ष तुझी ती भरली आहे ?
कुठे चालला स्मरे तुला का
काय अक्कल विकली आहे ?

ये जगताचे बंधन तोडून
पदी प्रीत अंथरली आहे
भिन्न तुझे अन जग माझे
पायवाट मी विणली आहे

काय करावे या मनाला
नाठाळ बुद्धी झाली आहे
मान्य मला ही प्रीती जरी
वाळू हातून गळली आहे

विक्रांत प्रभाकर