तु

Started by Sachin01 More, May 05, 2014, 01:35:47 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

पाहता तुला होई जीवनाचा विसर
रातभर जागून काढली पण
नाही झाला त्याचा काही असर

आनंदाच्या क्षणामध्ये मनी माझ्या कळी फुले
होता नजरा-नजर मन माझे डुले

आता तुझ्यामुळे जीव कशातच लागेना
वाचून-वाचून मन काही ध्यानावर येईना

तुझ्या रुपाची हि कसली माया
माग-माग येता तुझ्या माझी जिंदगी गेली पाया

तुझ्याकड पाहून दिवस जाई खास
सोबत नसता तु का होई भास
पाहता तुला
का वाढतो माझा श्वास

तुझ्या ह्रदयाची हाक मला सांग ना
मन माझ तुला विसरेल अस काहीतरी बोल ना ................
Moregs