गंध तूझा...

Started by शिवाजी सांगळे, May 10, 2014, 10:12:12 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे



गंध तूझा ...

भासला मलाच माझा,
चेहरा आज वेगळा
म्हणूनच कि काय?
आरसा हळूच हासला !

डोळ्यांत छटा आगळी,
गाली स्मित फुलोरा,
स्पर्श हलकेच होता,
मोगरा मोहक फुलला !

बोलणे कि हा अबोला?
निशब्द बोलून जाणे,
का अशी हुरहूर ती?
ओढ जीवाची जीवाला ?

नशा संगतीची तूझ्या?
जादू झाली कशाची?
जाणीवेने तूझ्या केवळ,
गंध तूझा दरवळला !


© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९