पाऊसधारा.....

Started by Tushar Bharati, May 11, 2014, 04:46:03 PM

Previous topic - Next topic

Tushar Bharati

चिँब चिँब भिजल्या पहिल्या पाऊसधारा
सुंगध मातीचा घेउनी दरवळे हा गार वारा....
आसुसलेल्या घरतीस जनु
हा बहुमोलाचा नजराणा....
चिँब चिँब भिजल्या पहिल्या पाउस
धारा.......... !

गडगड काळ्या ढगांची टक्कर
लेवुनी आली विजांची चमचम.
दाटले ढग अनं झाकोळला तो भास्कर.
अंधारलेल्या सृष्टीत विजांचाच प्रखर......
चिँबचिँब भिजले
पहिल्या पाऊसधारा .......... ..........!

घामेजलेल्या माथ्यावर पावसाचे थेँब.
बळिराजाच्या चेहऱ्यावर मात्र हास्याचे पेव.,
२ थेँब पावसासाठी केली किती प्रतिक्षा.
हात जोडुनी म्हणे आता पुरे
भरली हि शिक्षा........
चिँबचिँब भिजल्या पहिल्या पाऊसधारा.......
... !

पावसासंगे आज अश्रुही वाहले
प्रेमि ने प्रियसीला त्या ढगात पाहिले
आठवणिँना देऊनी उजाळा त्याने पुन्हा अनुभवले
पहिल्या पाउसधारा....
चिँबचिँब भिजले पहिल्या पाऊसधारा


कवि :- तुषार भारती.......... .....!