तुझी वाट.....

Started by Tushar Bharati, May 11, 2014, 05:26:03 PM

Previous topic - Next topic

Tushar Bharati

तुझी वाट पाहता पाहता..
हळूच मिटले गं डोळे..
विसरली असशील का गं..
तू कालचे सारे..
मीच वेडा आहे..
तुला एवढे बोललो...
कोवळ्या जिवाचं मन समजुन
घेण्याऐवजी काहिपण बोललो...

पाणावलेले डोळे
रात्री घट्ट मिटून घेतले..
स्वप्नात तरी आता तू येशील म्हनून..
तुला अगदी जवळून..
पाहता यावं म्हनून..
डोळ्याला डोळाही
लागेना
एक कुस बदलुन दुसऱ्या कुशीवर विसावलो....

कळतनकळत कधी झोप लागली,
स्वप्नांच्या नगरीत
शेवटी तु आलीच..
हसली दुरुन..
कालं जे झालं गेलं..
ते सारं विसरुन..

काय रे वाट का वाट पाहतोस.. काल तर पाहात
नव्हतास..
किती बोलत होतास...
मि खरं ते सर्व
सांगितले रे
पण तु काहि ऐकल नाही...

माझी परिक्षा घेण्याच्या.. प्रयत्नात
होतास..?
तू दाखवत नसलास..
तरी मला कळते..

तुझी वाट पाहण्याची कला.. मला खुप छ्ळते...
झालं ना काल बोलून तुझं..
आता मला बोलायचयं काही.. उद्या वाट पाहू
नकोस..

माझं येणं शक्य नाही..
तू वाट पाहू लागलास की
पाऊल नकळत तुझ्याकडे वळते..
मन वेडं तुझ्या सभोवती येऊन घुटमळते...

खुप खुप आठवेन रे आपली कर्जत ची भेट
तो खाल्लेला वडापाव अन घेतलेली लस्सी
खरंतर मि यातंच फसली..!

आता सावरायला हवं रे मला
निरोप दे आता..
आज तुला पाहुन घेऊ दे..
रात्र ही अस्ताला जाता जाता..

:- तुषार भारती (TUSH)
.