माझा एक अप्रतिम अनुभव…. थोडा वेळ देऊन वाचा… नक्की तुमच्या हृदयाला स्पर्श करेल

Started by prathamesh.manmode, May 21, 2014, 02:40:32 PM

Previous topic - Next topic

prathamesh.manmode

जय शिवराय....
माझा एक अप्रतिम अनुभव.... थोडा वेळ देऊन वाचा... नक्की तुमच्या हृदयाला स्पर्श करेल

काल मी चाकणच्या संग्रामदुर्ग येथे गेलो होतो सोबतीला माझा एक मित्र स्वप्नील पाटील हि होता. त्यालाही भटकंतीची आवड आहे. दुर्ग मोहीम झाल्यावर निघालो नाशिक फाट्याच्या थोडे आलीकडे एक लिंबू शरबत विक्रेता दिसला तहान तर लागलीच होती म्हणून पाहताच मी गाडी बाजूला घेतली त्याला म्हंटल दादा २ लिंबू शरबत देरे... क्षणाचा विलंब न लावता त्याने दोन शरबत चे ग्लास हातात दिले... एवढ्या यात माझे लक्ष त्याच्या गळ्याभोवती गेले गळ्यात शिवरायांची प्रतिमा ... मी विचारले कुठे राहतोस तू दादा ? मोठ्या अद्वियेने आणि निष्ठेने आणि एकदम स्पष्ट असे उत्तर दिले हे काय दादा इथेच मागे एक झोपडपट्टी आहे त्यातच एक आमची छोटीशी झोपडी आहे.... मी ठीक आहे म्हणून थोडा शांत झालो ... पण राहवले नाही मी परत एक प्रश्न केला.... दादा तुझ्या गळ्यात छत्रपती शिवरायांची प्रतिमा आहे तू मानतो का महाराजांना ? त्याने पुन्हा उत्तरले पण यावेळेस जे उत्तरले ते दीड इंच छाती फुगवून उत्तरले हो मी मानतो महाराजांना.... मला आनंद झाला... थोडा बोलण्यासाठी मोकळा झाला म्हणून बोलणे चालूच राहिले मी परत विचारले तू मानतोस महाराजांना तर तुला इतिहास हि माहित असेलच ना ? त्याने उत्तर दिले हो मंग माहित असणारच न मी पण हलक्या आवाजात त्याला म्हंटले आरे हो इतिहास तर ४ थी इयेत्तेपासून अभ्यासक्रमेत आहे... त्याचे पुन्हा उत्तर दादा मी थोडेही शिकलो नाही परिस्थितीने मला शिकू दिले नाही...मी विचारले मग तुला महाराजांचे आणि त्यांच्या इतिहासाचे एवढे ज्ञान आले कुठून... उत्तरला माझ्या आई कडून...मला फक्त माझी आई आहे मला बाबा नाहीत माझ्या आईने मला महाराजांची प्रेरणा देतच घडवला आहे...
आई नेहेमी सांगत आली आहे ज्या महापुरुषाची प्रेरणा घेत तू वाढला आहेस घडला आहेस तो व्यक्ती कधीही कोणासमोर झुकला नाही नेहेमी जिंकत आला आहे.... माझीही हि अपेक्षा आहे कि तू पण कधी हरू नकोस नेहेमी जिंकत रहा.... मला काम भेटत नाही म्हणून मी घरात कधीच बसलो नाही नेहमी काम करत असतो.... मग ते लिंबू शरबत विकण्याचे हि काम का असेना पण स्वताच्या कष्टाच्या पैश्यानेच मी आणि माझी आई घर चालवते... महाराजांची प्रेरणा म्हणजे एक प्रकारची शक्ती आहे असे म्हणायला हरकत नाही आणि मी हे सर्वांना सांगत आसतो आणि सांगत राहील.... आणि माझ्या आई सारखी सगळ्यांना आई मिळो असे गर्वाने सांगत असतो... मी खरच एक गोष्ट अनुभवली आहे ज्याच्या मनात महाराज विराजमान होतात त्याला सामोऱ्या येणाऱ्या संकटाची काडीचीही भिती नसते.... मी हे सगळे ऐकून थक्क झालो वाटले या माझ्या समोरच्या व्यक्तीला मिठी मारावी... हातात हात देऊन जय शिवराय म्हणत मी पुढची वाटचाल साधली...

हा माझा कालचा अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही...

२०/०५/२०१४

shashaank

जबरदस्त अनुभव....
सलाम त्या माय - लेकरांना आणि हा अनुभव शेअर केल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद ....




savita nare

lekh khupach sundar ahe. itihas mahit asayala shikshanachi avashyakata nasate. ani chh. shivaji maharajancha itihas mahit nasalela ekahi marathi manus nasanar ase mala vatate.


SHASHIKANT SHANDILE

प्रेरनादाई अनुभव आहे ,
अशिक्षित हि आपल्याला फार काही शिकवून जातो
Its Just My Word's

शब्द माझे!