चूक

Started by Prasad.Patil01, May 24, 2014, 12:00:49 PM

Previous topic - Next topic

Prasad.Patil01

आज हि जेव्हा कधी तू अचानक दिसते..
मन माझ तुझ्यावर रुसुनच बसते..

आठवतात तुझे ते जातानाचे शब्द..
तू होती बोलत मी ऐकत उभा स्तब्ध..

म्हणालीस - समजून घे मला आता विसर..
का ?? तू ग मोडले असे स्वप्नांमधले घर..

समजून घेतले तुला मात्र विसरू शकलो नाही..
बदललीस तू बाकी तसच सर्व काही..

बोलत असतात डोळे माझे मन रडत असत..
पाहून हि दैना मला जग सार हसत..

काळजी नको करू तुला बेवफा म्हणणार नाही..
दोष माझाच होता अस पुढे बोलल्या जाईल..

खरंच का ग तुला असं बदनाम होऊ देणार..
चारित्र्यावर तुझ्या मी का डाग लागू देणार..

इतके प्रेम केले तरी समजू शकली नाही..
निघून गेली वेळ आता समजवायचे नाही..

आयुष्याच्या सरतेवेळी इतके मात्र उमजले..
प्रेम केले तुझ्यावर इतकेच माझे चुकले..
इतकेच माझे चुकले....

Sachin kakde

Atishay sundar..
Shabdancha ani bhavanancha sangam ya kavitetun jhalay. Mana la lagli.
Lavkarch majhya kavitahi post karal mi mk vr

Prasad.Patil01


Kalu bhagat

All is fair in
Love and war