तुझ्या प्रीतीचे कवडसे

Started by विक्रांत, May 25, 2014, 01:28:06 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

तुझ्या प्रीतीचे कवडसे
माझ्या मनी उतरतात
माझ्या गर्द अंधारात
स्वप्न उषेचे उसळतात

तुझ्या सावळ्या रूपाने
ये शीतलता हृदयात
माझ्या दु:खाचा अंगार
नाहीसा करते क्षणात

तुझे बोलणे जलधारा
चिंब चिंब मला करतात
तुझेच शब्द चार अन
डोईवरी छत धरतात

लिहिता लिहिता कविता
तुजला मनी आठवतो
तुच कविता सखी माझी
शब्द व्यर्थ हे जाणतो

विक्रांत प्रभाकर