आलीस तू

Started by विक्रांत, May 28, 2014, 10:06:23 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



आलीस तू पुन्हा सखी
आषाढी मेघा सारखी

मिटली सारी काहिली
नभात वीज हसली

तू अस्तित्वात भिनली
मी वादळ उर्मी ल्याली

थेंब थेंब मन झाले
स्वप्न पडून सावळे

शब्दात भिजली प्रीत
प्राणात तुझेच गीत

विक्रांत प्रभाकर

Sachin01 More

Moregs

विक्रांत


Mayur Jadhav


विक्रांत