ग, राहू दे ग

Started by विक्रांत, June 05, 2014, 07:37:44 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

ग, राहू दे ग
तुज कळणार नाही
डोळे आभाळाचे
कधी दिसणार नाही

खडबडीत खोड
स्पर्श खुलणार नाही
तनु कोमल तया   
अर्थ कळणार नाही

किती प्रखर ऊन
शांती वरणार नाही
तुझे प्राजक्ताचे ओठ
दाह साहणार नाही

आग लागता वन
पाणी मागणार नाही
प्राण विझतांनाही
हाक येणार नाही 

तुझे सजोत स्वप्न
कुणा कळणार नाही
वाट बुजली जुनी
खुणा राहणार नाही

विक्रांत प्रभाकर