दूरचे नाते (कल्पेश देवरे )

Started by Kalpesh Deore, June 06, 2014, 10:21:27 AM

Previous topic - Next topic

Kalpesh Deore

       दुरचे नाते
दुरचे नाते हे असेच असते
क्षणात आपले नि क्षणात परके होते

पहिल्या भेटीसारखे नेहमीच भासते
जवळ असूनही कधी कधी दुर वाटते

आपल्या आयुष्याची हि एक तडजोड आहे
दुर राहून भविष्याला गती देत आहे

पण हा दुरावा तुझपासून दुर जाण्याचा नाही
आपल्या सुख समाधानार्थ भविष्याचा आहे

मिळावे सर्व तुला जे हवे हवेसे वाटते
तुझ्यासाठी केलेली धडपड हीच माझ्या मनी साठते

मन माझे निश्चिंत तुला पाहताच होते
तू जरी दुर असली तरी ध्यानी माझ्या नेहमीच असते

कवी - कल्पेश देवरे