गीत माझे हरवलेले!

Started by शिवाजी सांगळे, June 08, 2014, 08:34:58 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे





दुमडलेल्या दु:खाचे
कोन कसे मोजावे?
वाहिलेल्या अश्रुंचे
तळे कसे बांधावे?

सलणाऱ्या स्वप्नाचें
इमले कसे चढवावे?
दु:ख तुझेमाझे सारखे
कुणी कुणा सावरावे?

आयुष्य, भास खोटे
भोगातूच व्यापलेले,
नियतीचे चित्र वेगळे
क्षणात गात्र गोठलेले!

उरलेत फक्त आता
क्षण सूर साठलेले,
गंधात त्या स्वासांच्या
गीत माझे हरवलेले!

शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९