पाहिले ना मी ...

Started by श्री. प्रकाश साळवी, June 08, 2014, 05:23:08 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

पाहीले ना मी त्याला कधी हासताना
ना पाहीले कधी दु:खात काटे झेलताना

आहेत येथे सारे घडीचे प्रवासी
पाहिले जरी त्यांना नाकाने कांदे सोलताना

ते ऐकती जनाचे आणि करती ते मनाचे
कधिच नव्हते पाहिले  त्यांना दु:खात हासताना

हास्यात त्यांच्या नाहीच लाजणे हे
कधी लाजता खुलेपणाने दु:ख हे गोंजारताना

ते स्वत:चे राजेच म्हणविती नाही त्यांना माज
जगणे सुखाचे जागतात नाही कधी सुखवताना

श्री प्रकाश साळवी