मी उगा का व्यथांचा....

Started by श्री. प्रकाश साळवी, June 08, 2014, 05:31:15 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

गझल
वृत्त: व्योमगंगा
मात्रा : २८
[गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा ]

मी उगा का व्यथांचा....

मी उगा का  बाउ व्यथांचा करीतो सांजवेळी
ही छळीते रे मला का झींगलेली रात काळी

चांदरात्र गात होती गंधवेडी ही उभारी
नाचली ही अंगणाती रानफुलांची नव्हाळी

का उगा मी व्यर्थ या व्यथांना झेलीतो उराशी
आणिक कल्पांती कल्पनेच्या चघळीतो गजाली

पाहिले नानापरी ओघळीले आनंद सारे 
पाहू दे आता तरी या पेटलेल्या मशाली

शेवटी माझ्या व्यथांचे काय गुणगान गाऊ ?
लाड आनंदी मनाचेच ! करू दे ना दिवाळी

गांजलेल्या वंचनेचा कायसा संताप होतो
आज फूलाव मनाने या अस्मितेच्या सकाळी

होय आताशा जगावे सोडवोनी भेद सारे
खुलले हे चंद्रमुख फुललेल्या संध्याकाळी

श्री. प्रकाश साळवी दि. ०८  मे २०१४