षंढ जाहले सारे येथे

Started by SANJAY M NIKUMBH, June 09, 2014, 07:42:01 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

षंढ जाहले सारे येथे
=============
षंढ जाहले सारे येथे
कोण कशास पुढे येतो
भ्याड करिती वार कुणावर
जो तो बघ्याची भूमिका घेतो

जीव जातो येथे कुणाचा
तोच यांचा तमाशा होतो
डोळ्यांसमोर अत्याचार होतांना
मूकपणे तो पहात जातो

उसळायला हवे रक्त जेव्हा
गोठून तो उभा रहातो
सोयर सूतक नसल्यासारखा
माणुसकीचा गळा घोटतो

लाजिरवाणी ती असहाय्यपणे
त्या हैवानाशी झुंजत रहाते
उदिग्न तिच्या मनास
या बघ्यांचीच भीती वाटत रहाते

बाकी सारे शेळ्या होतात
तो एकटा शेर होतो
मर्दांच्या या गर्दीमध्ये
हिजडा बाजी मारून नेतो

कुठे गेली मर्दुमकी यांची
एकच प्रश्न सतावत रहातो
स्वार्थाच्या या बाजारात
माणुसकीला जळतांना पहातो
====================
संजय एम निकुंभ , वसई
दि.६.६.१४  वेळ : ११. ४५ दु .