अभंग पांडुरंगाचा

Started by SONALI PATIL, June 11, 2014, 11:20:30 AM

Previous topic - Next topic

SONALI PATIL

   अभंग पांडुरंगाचा


भक्तीत रंगतो,
भक्तात रमतो ।
भक्तीत मिळतो श्रीरंग ।
तुम्ही आठवा आठवा,आज पांडुरंग ।।१।।
भक्तात मिळतो,
दिन दयेत दिसतो।
ऊन वारा पावसातूनी,
डोगंर माथ्यावरून फिरतो।
दर्या-खोर्यातून वाहत आहे,
झुलत आहे झाडावरूनी ।
टाकीत मोहनी,
सुगंध देऊनी ,फुलवीत सृष्टी सारी ।।
पाठीराखा सखा बनूनी ऊभा श्रीरंग ...
तुम्ही आठवा आठवा आज पांडूरंग ।।२।।
सृष्टीच्या कना कना मध्ये,
अस्तीत्व तयाचे दाखवत आहे ।
रंगात रंगुनी,
भक्तात मिसळूनी ।
प्रेमाचा गूलाल उधळनी ,
ममतेचा वर्षाव करूनी,
हात भक्तांचा धरूनी ।
ऊभा पाठीशी श्रीरंग  ...
तुम्ही आठवा आठवा आज पाडुरंग ।।३।।
दिप ऊजळूनी तन मनाचा,
पांडुरंगाचा भाव बना....
भाव भुकेल्या श्रीरंगाला,
भक्तीचा वेढा तुम्ही घाला ।।
पांडुरंला प्रेमाने तुम्ही आळवा आळवा..
दिन दयेत दिसतो,
संत सजन्नाच्या छायेत बसतो ।
ब्रम्हाडांचा खेळ मांडीतो रोज नवा नवा...
तुम्ही आठवा आठवा आज पाडुंरंग नवा ।।४।।
जिवा शिवाचा भेद सांगतो,
रास रचुनी भक्तात नाचतो ।
श्रीरंगाचा भास रोज नवा नवा...
तुम्ही आठवा आठवा
श्रीरंगाचा प्रेम मळा ।।५।।

सोनाली पाटील