दोन डोळ्यातील दोन पाखरे,

Started by SONALI PATIL, June 14, 2014, 11:10:48 AM

Previous topic - Next topic

SONALI PATIL



दोन डोळ्यातील दोन पाखरे,
युगा युगाचे नाते सांगती ।

गोड गोजिरी केविलवाणी,
आकाश विहारी अध्यंतरी ।

फुला फुलावरूनी खेळत खेळी,
मधुर गोडवा,प्रित न्यारी ।

दोन डोळ्यातील दोन पाखरे
का नवखी आपसात झाली ।

गंध घेवूनी वा-यासंगे फडफडताना,
मऊ मखमली साद घातली ।

उंच मनोरा उंच भरारी ,
प्रित नवखी आपसात भिडली ।

जिव टाकती ओवाळूनी,
क्षितीज्याच्या उंचीवरूनी ।

उषःकालाच्या किरणासंगे,
घेत सोनेरी उंच भरारी ।

सांगत नाते युगा युगाचे,
क्षितीजाची तमा विसरली ।