पाऊल खुना ...

Started by SONALI PATIL, June 20, 2014, 03:24:58 PM

Previous topic - Next topic

SONALI PATIL

एक पाऊल टाक पुढे,
घालुन स्वप्नांचे पैजंन ।
एक पाऊल टाक पुढे,
निर्बलांची वाट बनुन..
झुगारून दे बंधनाच्या बेड्या,
तोड तु पिजं-याच्या सळया ।
बनव नवी वाट तुझी
एक पाऊल टाकुन पुढे ,
पहा तु उद्याचे स्वप्न रगूंन ।
मना मध्ये पेटू दे आशेचा दिवा ..
एक पाऊल टाकुन तु,
उमटव तुझ्या पाऊल खुना ...
वाटेवरी जाताना होतील जरी यातना,
दगड काटे वेचुन सारे
पदर भर तुझा रिकामा ।
एक पाऊल टाकुन तु,
लख्ख प्रकाश पाडावा ।
तुझ्या प्रेरणेने प्रज्वलीत होतील,
असंख्य वाती नव्या ।
हाता मध्ये हात घेऊन,
बनव तु मोठी श्रृंखला ...
पावला वरती पाऊले पडुन
बनव ऊंच मोठा मनोरा...
अकुंर बनुन उगवू दे
झाड स्वप्नांचे बनु दे ।
एक पाऊल टाकुन पुढे ,
उमटु दे तुझ्या पाऊल खुना...

maruti pawar

 खुप छान आहे तुमची कविता मला खुप आवडली.