वाळवी

Started by SONALI PATIL, June 20, 2014, 04:15:22 PM

Previous topic - Next topic

SONALI PATIL

   वाळवी


नको लावूस लळा जिव्हाळा
मी वृक्ष वटलेला...
वाळवीने मज पोखरले
खंत सतावते मज पुन्हा पुन्हा ..
न फुटावी पालवी आता
उर्मी स्फुर्ती पोखरली आहे,
तुसडून द्या आता,डावलून द्या ।
नको आता मायेचा ओलावा
सारे जिवन करपून गेले
सुख माझे वाळवंटातील
मृगजळ बनुनी राहीले ..
नका देवू मायेचा ओलावा ,
मृत्यूला मी कवटाळले आहे ।
निरोप द्यावा सुखाने ,आनंदाने
मृदंग टाळाच्या गजरात,
मृत्यु साजरा व्हावा माझा
नको रडण्याचा राडारोडा....