विठ्ठला धाव तू

Started by Pravin R. Kale, July 14, 2014, 10:14:41 PM

Previous topic - Next topic

Pravin R. Kale



कमरेवरती हात ठेवून
असाच किती दिवस उभा तू
खरंच आज तुझी गरज आहे
विठ्ठला आज तरी धाव तू

भर रस्त्यावर अत्याचार होताना
पाहना-यांना लाज वाटू दे
त्या वृत्तीचा नायनाट सोड
निदान आवाज उठवण्याची हिंमत दे
आज तुझी गरज आहे
विठ्ठला आज तरी धाव तू

अन्यायाला न्याय मिळेल
अशी काहीतरी सत्ता दे
गरज पडली काहीतर
तूही त्याचा भत्ता घे
शेवटी काहीही झाल तरी
आज तू निर्णय दे
चांगल्या निर्णयासाठी
आज तूझी गरज आहे
म्हणून म्हणतो विठ्ठला
आज तरी धाव तू


प्रविण रघुनाथ काळे
8308793007