का सोडून गेलास मित्रा …..

Started by भूषण कासार, July 16, 2014, 01:04:18 PM

Previous topic - Next topic

भूषण कासार

कवितेचा स्पष्ट आशय हा आत्महत्या या विषयाशी निगडीत आहे कृपया कविता पूर्ण वाचल्या नंतरच कवितेच अर्थ समजणे सोपे जाईल

फारच आठवण आली मित्रा,
म्हणून कविता लिहिलेय,

सांग  तुला पण आठवण आली का माझी,
का मलाच तुझी आठवण येतीये,

शाळा सोडल्यापासून भेटलोच नाही यार आपण,
ऑफिसमधला डबा खाताना मग आली तुझी आठवण,

चायनाच्या पेन साठी किती भांडलो मी तुझ्याशी,
लहान भावाप्रमाणे पुरविली तू इच्छा माझी,

अनेक आनंदच्या क्षणी तू पाठ फिरवली मित्रा,
पण दुखाच्या वेळी तूच माझा हाथ धरला,

आयुष्याच्या एका टप्प्यावर,
मी माझाच राहिलो नव्हतो,

पण खर सांगतो मित्रा तू जर नसता,
तर आज मी जिवंत नसतो,

पण ?

तुझ्या आणि माझ्या मैत्रीला काय झालाय आता,
कविता लिहिलीय मी तुझ्यासाठी आणि वाचतोय कोणी दुसरा,

का तू असा अबोल झालास,
मला न सांगताच तू इतका टोकाचा निर्णय घेतलास,

नाही का आली तुला माझी आठवण,
मीही दिला असता न तुला मदतीचा हात,

की  परका वाटलो मी तुला,
म्हणून सोडून गेलास तू आज मला,

या अनुउत्तरीत प्रश्नाच उत्तर कोण देईल मला ?
यार तू घेना पुन्हा जन्म नवा.


MK ADMIN


Bhushan Kasar

Dhnaywad,
Tumchi Prerna Milalyas Ajun Changle Lihayla Anand Hoil..