मातृत्व

Started by aap, July 24, 2014, 05:40:10 PM

Previous topic - Next topic

aap

मातृत्व

वात्सल्याची ती देवता
मायेची ती ममता

बाळास भरवते तुकडा
पडे दिवस तिला तोकडा

प्रकाशासाठी होते समई
जळत राहते ती आई

बाळकृष्ण मानून पालन
उगाळते हाडाचे चंदन

आपत्यरुपी गोड गीत
जीवनाचे होते संगीत

मातृत्व असे संसाराची पूर्तता
मातृत्व हि स्त्री जीवनाची सांगता
सौ . अनिता फणसळकर