* कोण आहेस ग तु सखे *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 25, 2014, 06:19:38 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

कोण आहेस ग तु सखे
कधी वाटे लखलखती चांदणी नभाची
कधी वाटे भरती-ओहोटी दर्याची
कधी वाटे न कळणा-या मनाची

कोण आहेस ग तु सखे
कधी वाटे स्पंदने माझ्या ह्रदयाची
कधी वाटे परी माझ्या स्वप्नांची
कधी वाटे सावली माझ्या देहाची

कोण आहेस ग तु सखे
कधी वाटे चाहुल रिमझिमत्या पावसाची
कधी वाटे झुळुक गारव्याची
कधी वाटे मधुर तान कोकिळेची

कोण आहेस ग तु सखे
कधी वाटे नसुन जवळ असल्याची
कधी वाटे ओढ अतृप्त भावनांची
सांग सखे आता खरच माझ्यासाठी
कोण आहेस ग तु...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Çhèx Thakare