फेरा सुख-दुखःचा...

Started by Shivshankar patil, July 26, 2014, 04:00:02 PM

Previous topic - Next topic

Shivshankar patil

फेरा सुख-दुखःचा...


दिले जरी तुला नियतीने दुखः
सुखा साठी होऊ नको लाचार,
तुझ मधे नसावी गुर्मी पण
जरूर असावी ऊर्मी...

दुखःचा डोंगर पार कर नेटाने गडया,
नक्कीच उगवेल सुखाची पहाट.
येता सुख तुझ्या वाट्याला
कर शिडकाव थोडा दुसर्यांनवरती..
कोना निशबी काय असे,
ठाव नसे, त्याला न कोणाला.

जे आले नशिबाने तयांच्या
आपलस करुन भोगावे तयाला
क्षणात होतो भिकारी  राजा,
सुख दुखःच्या फे-यातून
नाही सुटले देव आणीक दानव.


शिवशंकर बी. पाटील .
९४२१०५५६६७