निजलो आहे कुशीत ज्याच्या

Started by केदार मेहेंदळे, August 01, 2014, 10:06:58 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

निजलो आहे, कुशीत ज्याच्या, बाप नसे तो, काळ आहे
विसंबून मी, आहे ज्यावर, तो माती अन, गाळ आहे
 
हा मातीचा, ढेर दिसे जरी, इथे गाडले, गाव सारे
लाल लाल या, माती खाली, हिरवा हिरवा, माळ आहे

दोष असे का, भूमातेचा, अजून करते, सहन मजला
स्वार्था पाई, या मातीशी, मीच तोडली, नाळ आहे

जंगल झाडे मीच तोडली डोंगर सारे मी फोडले 
तरी आज का या मृत्यूचा अतिवृष्टीवर आळ आहे


केदार...

मात्रा : ८+८+८+७ = ३१