असे कसे हे प्रेम

Started by SANJAY M NIKUMBH, August 05, 2014, 07:15:53 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

असे कसे हे प्रेम
=================
सूर्याच्या उगमा आधी
मनात तुझा उगम होतो
तुझा प्रीतगंध श्वासास
हलकेच हलवून जागवतो

रात्रीही निजतांना तुझी
आठवण उशाशी घेतो
डोळ्यांच्या पापण्या उघडतांना
तुझा चेहरा समोर येतो

मी तुझा झाल्यापासून
तुझाच होऊन जगतो
प्रत्येक क्षण माझा
प्रेमाचा होऊन जातो

असे कसे हे प्रेम
मी मलाच विसरून जातो
तुझेच नावं ओठांवरी
माझे नावही विसरून जातो
===================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ५. ८. १४  वेळ : ६. ३० स .