सोसन्याचा घेतला आम्हीच ठेका

Started by madhura, August 16, 2014, 11:58:58 AM

Previous topic - Next topic

madhura

सोसन्याचा घेतला आम्हीच ठेका
भोगन्याचा तू नको सोडूस हेका...

घेतला काढून खांदा ऐणवेळी
अन् म्हणाले "साह्य करुया एकमेका"...

राहु दे खाली जरी मी राहिलो तर
टोक,घेवुन गाठ तू माझाच टेका...
.(टेका-आधार).

आग लावुन जे पळाले,ते पळाले
या गडेहो मस्त अपुले हात शेका...

फार होतो त्रास मज ह्या 'शायराचा'
(दुःख माझे तुज कधी हे बोलले का...?)

मी कुठेही उगवतो हे भाण राखा
पाहिजे तितके मला उपटून फेका...

मी तुला काढुन देतो प्राण माझा
फक्त इतुके सांग तुजला पाहिजेका...

-- iiii***किशोर मुगल***iii