अट कसलीच नाही

Started by विक्रांत, August 16, 2014, 11:02:48 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

आज कशी वाट माझी
रिक्त उदास जाहली 
का न कळे मज सखी       
अजुनी आलीच नाही

मांडवात फुले किती
बहरूनी बाग गेली
गंध मोगरीचा धुंद
मनी भिनलाच नाही

मी शब्द अंथरूनी
उभा असे हा कधीचा
ती उचलुनी त्या वाह
परी म्हटलीच नाही

नको भिउस जगाला
उगा अथवा स्व:तला
सांग प्रीती तुझी तुज
काय कळलीच नाही

नच रुपात प्रेम वा
नच धनात प्रेम हे
ये अशी उगा उगाच
अट कसलीच नाही

जगतात जगी लाख
मरतात किती लाख
प्रीती वाचून परी ते
सखी जगणेच नाही

विक्रांत प्रभाकर