डायरीतून .. (३)

Started by Çhèx Thakare, August 17, 2014, 01:17:45 AM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

डायरीतून ... (३)
.
नेहमीप्रमाणे ति online होती
लगेच रिप्लाय मिळेल या आशेने आजही मी, मेसेज टाकला
.
5 मि. झाले
नो रिप्ले, 
10 मि. झाले, 
नो रिप्ले
मग 20  मि.
मग 1 तास
.
काहीच नाही ..
.
संतापात नेट बंद करून टाकले 
.
किती आशावादी असतो ना आपण..??
.
*आपण अश्या व्यक्तीची वाट पाहत असतो जी व्यक्ती आपलच वाट लावत असते,  तरीही आपण तिची वाट पाहत असतो. *
.
खर तर हा जो वाट पाहण्याचा काळ असतो ना खुप वाईट काळ असतो,  सतत मनाला टाचणी टोचल्या सारखा टोचत असतो,  त्यावेळी आपण अगदी वेडे खुळे असतो,  एक एक मिनीट एका तासा प्रमाणे अनूभवत असतो.
.
प्रयत्न असतो कि तो पर्यंत दुसरी कडे मन रमवू,  पण अडकलेल्या मनाला ओढून बाहेर काढता तरी येईल काय ?
.
मन तर म्हणत कि त्या व्यक्तीकडे धावत धावत जा,  अन सांग त्याला कि
.
मी मेसेज टाकलाय जरा बघ,  मी मुर्ख नाहीये,  मी कधी पासून रिप्लायची वाट पाहतोय
.
तु पाहून न पाहील्या सारखे करू नकोस,  मला फार वाईट वाटते मग

प्लिज तु एकदा तरी मेसेज बघ ना, मी काहीतरी बोलतोय,  निदान माझ मन ठेवण्यासाठी तरी ऐक ना
.
मी पुन्हा नेट चालू करतो, नोटीफीकेशन येते
पाहतो तर काय ?? रिप्लाय आलेला
.
बोट अशी पळतात,  कधी पेपर ला ईतकी पळाली असती तर आज पर्यंत शेवटच ऊत्तर कधी अर्ध्यावर सोडून कक्षातून बाहेर नसत पडावं लागलं
.
*पण काय करणार यडपट मन,  अन त्याचे ते खेळ,  आणि मग पुन्हा तो भावनांचा जिवघेणा मेळ *
.
©  चेतन ठाकरे