डायरीतून .. (१०)

Started by Çhèx Thakare, August 17, 2014, 01:36:13 AM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

डायरीतून ... (१०)
.
.
मी ठरवल होत आज काय ते फायनलच करून टाकू. 
रोज रोज च झालेलय आता  ,  मला सहन नाय होय आता हे, काय ते एकदाच करूनच टाकतो.
.
तिला फोन लावतो
.
" ट्रिंग ट्रिंग,  ट्रिंग ट्रिंग "
फोन कट केला जातो
पुन्हा " ट्रिंग ट्रिंग "
पुन्हा " फोन कट "
.
दहा मिनीट नंतर मिस काँल येतो
मि फोन केला
.
" हँलो बोल "
" काय ठरवलंय  "
" कशा बद्दल ..?"
" माझ्या बद्दल, माझ्या बद्दल बोलतोय मी "
" खर सांगू का,  हे बिलकूल शक्य नाहीये,  मी तुला कालच सांगणार होते,  कि आता हे सर्व थांबवायला हवं,  पण माझी हिम्मत होत नव्हती "
" तु खरचं बोलतेय "
" हो "
" ठिक आहे,  जशी तुझी ईच्छा "
" एक विचारू का,  शेवटच  "
मी काहीच बोलत नाही
" मला विसरशील का रे  ..?  "
" तुला काय वाटतं "
" मला नाय समजत,  मला वाटत तु नाय विसरणार "
" तु माझ्या आयुष्याय एक अस गोड स्वप्न होत जे कधीच खर झाल नाही,  ते स्वप्न खरं करण्यासाठी मी खुप प्रयत्न केले,  पण काही गोष्टी कधीच शक्य होत नाही.  "
" am really very sorry रे "
" मला एक वचन देशील "
" एक काय दहा देईन "
" शक्य होईल तेवढ्या लवकर विसरून जा,  स्वत:ची काळजी घे,  करीयर कडे लक्ष दे अन खुप मोठा हो "
" हो ,  ईथुन पुढे मी तुला कधीच फोन नाय करणार "
" पण का ..?"
.
मी फोन कट केला
.
तिचा फोन आला
मि पुन्हा कट केला
.
डोक्यात नुसत,  तेच,  मला विसरून जा,  मला विसरून जा
.
शक्य आहे विसरण ..?
ईतक सोप्प आहे का कोणाला विसरणं
.
डोळ्यात पाणी आलं होतं,  कँन्टीन चा गोंगाटा सहन होत नव्हता,  डोक्यात जात होत सर्व,  किती बडबड करतात हि लोकं कधी कधी,  जाऊन एक-एकेकाच्या मुस्काटात मारूशी वाटत होती.
.
मला एकांत हवा होता,  बाकी काही नाही
मि तेथून ऊठलो,  पार्किंग ला गेलो गाडीला चावी लावताच पुन्हा तिचा फोन,  ति पुन्हा पुन्हा फोन करत होती,  मी फोन कट करत होतो,  मी गाडी काढली,  फोन कट करून वरच्या खिशात ठेवला
.
डोक्यात तेच,  मला विसरून जा,  मला.विसरून जा
.
तिचे शब्द जसे जसे अठवत होते स्पिड अन गिअर तसे तसे वाढत होते
.
वारयाचे फटके चेहरयावर फाडss फाड लागत होते,  काटा ११० वर होता,  बरोबर च्या गाड्या कधी मागे जात होत्या कळत नव्हते,  मी सुसाट होतो. 
.
तेवढ्यात डाविकडून अचानक ट्रक आला
.
ध्धाडsssssssssssss!!
.
फोन चि रिंग वाजत होती, एक्सलेटर चा आवाज येत होता ,  मग सगळ काळ दिसत होत,  डोक कशावर तरी आदळल आणि डोळ्यासमोर पुर्ण अंधार आला.
.
©  चेतन ठाकरे